डॉ उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात काम करतांना आवड म्हणून कामाव्यतीरिक्त रूग्णसेवेचा छंद जोपासतांना अनेक अनूभव आले. यातील एक अनुभव आपल्याशी शेअर करत आहे. रूग्णसेवेचा छंद आणि त्यातून मिळणारा आनंद अनुभवत असतांना अनेक हदयद्रावक प्रसंगाना सामोरे जावे लागले. माझे मित्र आयुर्वेदात सुवर्णपदक विजेते डॉ शिरूडेंचा फोन आला. एका आजीचे छोटे काम आहे तुमच्या रूग्णालयात त्यांना मदत करा असा आदेशच त्यांनी दिला. डॉ शिरूडे माझेकरीता देवदूतच बाबांच्या आजारापणात त्यांच्या उपचारांची बरीच मदत होउन बाबा ८१ वर्षाचे असूनही ठणठणीत आहे.असो मी त्यांना पाठवा सांगीतले व माझे कामाला लागलो. दिवसभर वाट पाहूनही आजी आल्या नाहीत. मी विसरून गेलो. पण दूस—या दिवशी रूग्णालयात पोहचलो कामाला सूरूवात करणार तेवढयात स्वागत कक्षातून फोन आला एक आजी तुम्हाला भेटायचे म्हणतात मी त्यांना बसवण्याच्या सूचना करून स्वागत कक्षाजवळ पोहचलो. जातांना मनात विचार होते. काय काम असेल, उपचारात सवलत हवी की फुकट उपचार हवे असे एक ना अनेक प्रश्न घोळत होते. आजींजवळ येउन विचारपूस केल्यावर कळले की आजींच्या मुलाचा दोन वर्षापुर्वी अपघात झाला होता. तो आमच्या रूग्णालयात दाखल झाल्यावर गेला होता. त्यांच्या इन्शुरन्सच्या कामासाठी त्या आल्या होत्या. साधारणसे लुगडे घातलेली अंदाजे ७५ वर्षाची ही म्हातारी होती. दोन वर्षापुर्वीचे रेकार्ड शोधणे म्हणजे महाकठीण काम होते. र्इींर कामासाठी प्रशासकीय विभागात सुचना देउन रेकॉर्ड रूमला मिलींद पाटील यांचेशी बोललो, ते बोलले म्हातारीला पाठवा मी शोधतो. मी त्याला बोललो अरे तूला तारीख देतो शोध आणि मला फोन कर मी येतो घ्यायला तीला त्रास देउ नको. मिलींद पाटील तयार झाले पण त्यांनी दोन ते तीन तास लागेल असे सांगीतले. इव्हाना १० वाजत आले होते. मी आजींना तिथेच बसवून कुठे हलू नका तुमचे सर्व कामे मी करून देतो असे सांगीतले. तिच्याजवह फोनही नव्हता कूठे शोधत बसणार म्हणून तिथेच थांबून राहण्याची धमकी वजा सूचना करून माझे देैनदिन काम सूरू केले. कामाचा ताण जास्त असल्याने एक कधी वाजला कळले नाही. मी मिलींदला फोन केला त्यांने फाईल शोधून ठेवली होती. प्रशासकीय विभागातले कामही जवळपास झाले होते. आजींजवळ गेलो आणि पाहीले तर त्या भजे खात बसल्या होत्या. मी विचारले आजी कँन्टीन आहे जेवून घ्या ४० रू मध्ये जेवण मिळते. लगेच आजीच्या डोळयातून टचकन पाणी आले. मला त्या बोलल्या बाबा माझेजवळ पैसा नाही कसेबसे दिवस काढत आहे. तुझे काकाही अर्ध्यावर साथ सोडून गेले, मुलगा होता तोही दोन वर्षापूर्वी गेला घरात आता सर्वत्र अंधार आहे. या इन्शूरन्सच्या पैशांची मदत होईल हा शेवटचा आशेचा किरण आहे. मला राहवले नाही मी त्यांना बोललो चला कँन्टीनमध्ये सोबत माझा टीफीन घेतला त्यांना तिथे जेवायला बसवले. त्या बोलल्या तू कशाला उपाशाी राहतो मी त्यांना सांगीतले आजी मला कँन्टीनमधून जेवण मिळेल तुम्ही जेवा सावकाश आजींचे जेवण होईपर्यंत तिथेच थांबलो. नंतर स्वताचे जेवण केले. प्रशासकीय अधिकार—यांशी चर्चा करून सर्व कागदपत्रे पुर्ण केली आणि छायांकीत प्रति देउन आजींना रवाना केले. जातांना अजून काही मदत लागली तर फोन करा येउ नका असे सांगीतले. देवही कसा अंत पाहतो ना? असो जातांना डोक्यावर हात ठेवून दिलेला आर्शिवादाची शिदोरी घेउन मी परत आपल्या कामाला लागलो.
No comments:
Post a Comment